पश्चिम इंडोनेशियामध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी (१६ जानेवारी) सकाळीच ही घटना घडली आहे. या घटनेतील जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मिलालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के इंडोनेशियामधील सुमात्रा बेटांच्या किनाऱ्यावर बसले आहेत. भूकंपाचे केंद्र सिंगकी शहराच्या दक्षिण पूर्वेस ४८ किलोमीटर आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.३० वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. सध्यातरी या भूकंपात कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. भैगोलिक स्थानामुळे इंडोनेशियामध्ये सतत ज्वालामुखी बाहेर येणे, तसेच भूकंपाच्या घटना घडतात. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५.६ रिश्टिर स्केल तीव्रतेच्या भूकंपात येथे ३३१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर साधारण ६०० नागरिक जखमी झाले होते.