नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के दिल्लीमध्येही जाणावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हरियाणामधील झज्जर येथे हे भूकंपाचे धक्के बसून जमिनीच्या ५ किमी खाली भूकंपाचे केंद्र आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री साधारण १ वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के दिल्लीमध्येही जाणवले आहेत.
हेही वाचा >> विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?
दरम्यान, याआधी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडमधील नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल होती. यावेळीदेखील दिल्लीमध्ये हादरे बसले होते.