Earthquake in Kargil Ladakh : लडाखमधील कारगिल भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर इतकी आहे. सायंकाळी ७ वाजल्याच्या दरम्यान हा भूकंप झाला. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती नाही. एक दिवसापूर्वीच रविवारी (२६ डिसेंबर) हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये देखील भूकंपाचे झटके बसले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : देशातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर सोशल मीडियावर #Earthquake ट्रेंड

दरम्यान, २२ डिसेंबरला देशातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कर्नाटकातील बेंगळुरूजवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात सकाळी सलग २ दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आणि ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मांडिकल आणि भोगपर्थी गावांजवळ होता. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ आणि ३ इतकी मोजली गेली.

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे धक्के बसले. यावेळी भूकंपाची तीव्रता मागील धक्क्यांपेक्षा जास्त होती. या भागात ७ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का जाणवला होता. मात्र, यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.

सोशल मीडियावर #Earthquake ट्रेंड

विविध ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग अर्थक्वेक (#Earthquake) ट्रेण्ड झाला होता. नेटकरी मजेशीर कमेंट्स, मीम्स शेअर करत ट्वीट करत होते, तर अनेकांनी कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याने सुटकेचा निश्वास सोडला.

टीप – या भूकंपाविषयी अधिक माहिती मिळत आहे. लवकरच याबाबतचे सविस्तर तपशील दिले जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake of magnitude 5 in kargil ladakh know all updates pbs