आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे. यामध्ये जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी नेपाळ परिसरात भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप ५.४ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किलोमीटर खोल होता.
या भूकंपाचे हादरे भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात जाणवले आहेत. दिल्लीसह उत्तरप्रदेशातील बरेली, कानपूर, लखनऊ परिसरातही धक्के जाणवले आहेत. या घटनेत जीवितहानी झाल्याची किंवा पडझड झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही.