भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. सोमवारी रात्री ८ वाजून १९ मिनिटं आणि ४७ सेकंदांनी हा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे. भारत-बांगलादेशच्या सीमेवर झालेल्या भूकंपामुळे ईशान्य भारतातील परिसर हादरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या भूकंपात पडझड झाल्याची किंवा जिवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या करीमगंजपासून वायव्येस १८ किलोमीटर अंतरावर होता.

भारतीय भूकंपविज्ञान केंद्रानुसार, मेघालयातील चेरापूंजीपासून नैऋत्य दिशेला ४९ किमी अंतरावर होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १६ किलोमीटर खोल होता. सोमवारी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी भारत-बांगलादेश सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. यामध्ये जिवीतहानी झाल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आली नाही.