एपी, कहरामनमारस (तुर्कस्तान) : तुर्कस्तान, सिरियातील विनाशकारी भूकंपानंतर चार दिवसांनी मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. जसजसे दिवस उलटत आहेत तसतशी ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली आहे. तुर्कस्तानशिवाय युद्धग्रस्त सीरियात ३,३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने मृतांची संख्या २१ हजार ६०० झाली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, तुर्कस्तानच्या इस्केंदरनमधील बचावकर्त्यांनी सुमारे १०१ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांची शुक्रवारी सकाळी सुटका केली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात एका छोटय़ाशा जागेत एकत्र राहिल्याने सहा जण वाचू शकल्याचे बचाव कर्मचारी मुरत बेगुल याने सांगितले. हे सहाही जण परस्परांचे नातलग आहेत. गझियन्तेप शहरातील इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका किशोरवयीन मुलाची सुटका केल्यानंतर त्याच्या आप्तस्वकियांना जल्लोष केला.

जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली असताना, अशा घटनांमुळे बचाव पथकाचा बचावकार्यासाठीचा जोम वाढत आहे. तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी ३५ लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे. काही शहरांच्या रस्त्यांवर पांघरूण, गालिचे व कापडांत गुंडाळलेले मृतदेह पडले आहेत. शवागार व स्मशानभूमीवरही ताण वाढला आहे. या भागातील तापमान गोठणिबदूच्या खाली आहे.

तुर्कस्तानमध्ये १८ हजार ३४२ मृत्युमुखी

तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले, की तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत १८ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच सुमारे ७५ हजार नागरिक जखमी झाले आहेत. किती लोक बेघर झाले आहेत याची कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ७५ हजारांहून अधिक वाचलेल्या नागरिकांना इतर प्रांतात हलवले आहे. युद्धग्रस्त सीरियात तीन हजार ३०० हून अधिक ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २१ हजार ६०० हून अधिक झाली आहे.

किशोरवयीन मुलाची ९४ तासांनी सुटका

भूकंपाच्या केंद्राजवळील गझियन्तेप भल्या पहाटे बचावकर्त्यांनी तळघरात अडकलेल्या अदनान मोहम्मद कोर्कुटला या १७ वर्षीय मुलाला बाहेर काढले. तो चार दिवसांपासून येथे अडकला होता. त्याची सुटका केल्यानंतर त्याचे आप्तस्वकीय, मित्र त्याला हाका मारत होते. त्याने गर्दीकडे पाहून स्मितहास्य केले. त्याला त्याला ‘स्ट्रेचर’वरून नेताना गर्दीतल्या अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. त्याला त्याच्या आईने मिठी मारली. रुग्णवाहिकेतून नेण्यापूर्वी अनेकांनी त्याला मिठी मारली. ‘तुम्ही माझ्या मदतीसाठी आलात, त्याबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे व तुम्हा सर्वाचाही आभारी आहे’ अदनान येथे ९४ तास अडकला होता. आपली तहान भागवण्यासाठी त्याला स्वमूत्र प्यावे लागले. ‘मी अशा तऱ्हेने स्वत:ला जिवंत ठेवले,’असे अदनान म्हणाला. अदनानला वाचवताना एका बचाव कर्मचाऱ्याला आपल्या तेवढय़ाच वयाच्या मुलाची आठवण आली. त्याने भावनिक होऊन अदनानला आिलगन दिले.

पिण्याचे पाणीही गोठले !

मुस्तफा तुरान आपल्या भूकंपग्रस्त नातलगांना शोधण्यासाठी भूकंपाच्या काही तासांनंतर इस्तंबूलहून त्याच्या मूळ गावी अदियामानला रवाना झाला. त्यांनी विमानतळ आणि शहराच्या मध्यभागापर्यंत तब्बल २४८ कोसळलेल्या इमारती मोजल्या. एका पत्रकाराने शुक्रवारी सांगितले, की त्याचे १५ नातलग मृत्युमुखी पडले आहेत. ऐन थंडीत बरेच जण बाहेर किंवा तंबूत झोपत आहेत. पहाटे चारच्या सुमारास एवढी थंडी पडली की आमचे पिण्याचे पाणी गोठले.