निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाषण करताना शब्द जपून वापरा असा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ‘पनवती’ आणि पाकिटमार हे शब्द वापरले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नोटीस बजावली होती. त्यामध्ये असं म्हटलं होतं की निवडणूक प्रचारादरम्यान स्टार प्रचारकांनी राजकीय नेत्यांबाबत बोलताना भान बाळगलं पाहिजे असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांना जपून बोला असा सल्ला निवडणूक आयोगाने दिला आहे. जाहीर सभेत बोलत असताना भान बाळगा, शब्द जपून वापरा असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

हे प्रकरण नेमकं काय?

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेत्यांच्या विरोधात भाषण करताना पाकिटमार, पनवती असे शब्द वापरले होते. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंबंधी कारवाई करण्यात सांगितलं होतं. तसंच राहुल गांधींना नोटीसही बजावली होती.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

हे ही वाचा- काँग्रेसला आणखी एक धक्का! राहुल गांधींची पदयात्रा गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वी तीन माजी आमदार भाजपात

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने १ मार्च रोजी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे आणि प्रचारादरम्यान भाषण करताना शब्द जपून वापरा आणि विशेष काळजी घ्या असं सांगितलं आहे. राहुल गांधी हे स्टार प्रचारक आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कोणतेही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की कुठल्याही नेत्याने मतदारांशी बोलताना धर्म, भाषेच्या नावावर मतं मागू नये. भक्त आणि देव यांच्यातला संबंध, त्यांची श्रद्धा यांची थट्टा करु नये किंवा खिल्ली उडवू नये. कुठलंही मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा याबाबत किंवा कुठल्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाऊन प्रचार करु नये. कुठल्याही स्टार प्रचारकाला जर आधी नोटीस बजावली असेल आणि त्या प्रचारकानेही हे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.

Story img Loader