पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिला आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने करोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

दरम्यान सोमवारी भाजपानेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आय़ोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केला होता. भाजपाने दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec asks petrol pumps to remove hoardings with pm modi photos within 72 hours sgy