समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. उत्तरप्रदेश शासनाकडून कंत्राटी पद्धतीवर नोकरीसाठी ठेवण्यात आलेल्या शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान करावे अन्यथा कामावरून त्यांची हकालपट्टी करण्याची धमकी मुलायमसिंह यांनी एका जाहीर सभेत दिली होती. त्यानंतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करताना निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुलायमसिंह यांना येत्या रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली. तसेच निवडणूक आचारसंहितेच्या काळात केंद्र किंवा राज्यसरकार आपल्या प्रचारासाठी सत्तेचा वापर करू शकत नाही याची आठवण निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना करून दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा