निवडणूक लढविताना मालमत्तेचा सर्व तपशील जाहीर न केल्याने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नींच्या विरोधात निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली आहे. वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेला मालमत्तेबाबतचा तपशील आणि दडवून ठेवलेली मालमत्ता याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने मागितली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी नरेंद्र चौहान यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, मोठा दस्तऐवज टपालाने पाठविण्यात आला असला तरी आपल्याला तो अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतचे उत्तर पाठविण्यासाठी आपल्याला कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही, असेही चौहान म्हणाले.वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नीने निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेबाबतचा संपूर्ण तपशील सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
वीरभद्र यांच्या प्रतिज्ञापत्राबाबत आयोगाने अहवाल मागविला
निवडणूक लढविताना मालमत्तेचा सर्व तपशील जाहीर न केल्याने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नींच्या विरोधात निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.
First published on: 08-01-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec seeks report on poll affidavits of virbhadra