निवडणूक लढविताना मालमत्तेचा सर्व तपशील जाहीर न केल्याने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नींच्या विरोधात निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली आहे. वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेला मालमत्तेबाबतचा तपशील आणि दडवून ठेवलेली मालमत्ता याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने मागितली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी नरेंद्र चौहान यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, मोठा दस्तऐवज टपालाने पाठविण्यात आला असला तरी आपल्याला तो अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतचे उत्तर पाठविण्यासाठी आपल्याला कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही, असेही चौहान म्हणाले.वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नीने निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेबाबतचा संपूर्ण तपशील सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा