लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सोशल मीडियावर किती पैसे खर्च करतात, यावर आता निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. पश्चिम बंगालचे सहायक निवडणूक आयुक्त अमितज्योती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली.
विकीपीडिया, फेसबुक, ट्विटर, यूट्युब इत्यादी सोशल नेटवर्किंग साईट्सवर निवडणूक आयोग कटाक्षाने लक्ष ठेवणार आहे. या सोशल मीडिया साईट्सवर कोणता राजकीय पक्ष, कोणता नेता कोणकोणते ऑनलाईन कार्यक्रम ठेवतो आहे. त्यावर किती खर्च केला जातोय, यावर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. सोशल मीडियावर राजकीय पक्ष किती खर्च करतात, यावर निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे, असे भट्टाचार्य यांनी माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत सांगितले. मात्र, याबाबत सविस्तरपणे कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

Story img Loader