भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत असून मोदी सरकारच्या पहिल्या तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर हा ७.४ टक्के राहिला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. स्थूल आर्थिक स्थिती चांगली राखण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अर्थ समितीसमोर बोलताना त्यांनी सांगितले, की स्थूल आर्थिक स्थिती कायम राखून आठ टक्के आर्थिक वाढीचा दर गाठण्याचा आमचा संकल्प आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता ऊíजतावस्थेत असून एप्रिल ते डिसेंबर २०१४-१५ या पहिल्या तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर ७.४ टक्के होता तो याच काळात गेल्यावर्षी २०१३-१४ मध्ये ७ टक्के होता. मध्यम मुदतीच्या वाढीची स्थिती चांगली असून कोळसा व इतर खाणकामाला सुरुवात झाल्याने परिस्थिती सुधारली आहे. उदारीकरणात थेट परकी गुंतवणुकीच्या मर्यादा वाढवल्या आहेत. पायाभूत सुविधात गुंतवणूक वाढवली आहे त्यामुळे गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण होईल.
ग्राहक किंमत निर्देशांकाच्या चलनफुगवटय़ाबाबत त्यांनी सांगितले, की मार्च २०१५ मध्ये चलनवाढ कमी होऊन नोव्हेंबर २०१३ मधील ११.२ टक्क्य़ांवरून आता ५.२ टक्के झाली आहे. लवचिक चलनवाढीत विशिष्ट धोरण अवलंबले असून रिझर्व बँक ऑफ इंडिया चलनवाढ ही ४ (अधिक-उणे) २ पर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. २०१६-१७ पासून दोन वर्षांत ती ४ टक्क्य़ांपर्यंत खाली येईल. भारत आर्थिक मजबुतीकडे वाटचाल करीत असून २०१५-१६ मध्ये आर्थिक तूट ३.९ टक्क्य़ांपर्यंत खाली आणण्याचा विचार आहे. ती २०११ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ५.७ टक्के होती. भारताची चालू खात्यावरील तूट २०१२-१३ मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ४.८ टक्के होती ती २०१३-१४ मध्ये १.७ टक्के झाली व २०१४-१५ मध्ये ती १.३ टक्क्य़ांपर्यंत खाली येईल, असे ते म्हणाले.
तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर ७.४ टक्के-जेटली
भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत असून मोदी सरकारच्या पहिल्या तीन महिन्यांत आर्थिक वाढीचा दर हा ७.४ टक्के राहिला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
First published on: 20-04-2015 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economy clearly on recovery path arun jaitley