मनी लॉण्डरिंगप्रकरणी सुरू असलेल्या तपासाअंती वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी तसेच बीसीसीआयचे माजी सर्वेसर्वा एन. श्रीनिवासन यांच्यासह इतरांच्या २३२ कोटींहून अधिक रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे.
श्रीनिवासन् यांनी लाच दिल्याच्या आरोपप्रकरणी मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. जगनमोहन यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत श्रीनिवासन् हे मे. इंडिया सिमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक होते. त्या वेळी त्यांच्या कंपनीवर मेहेरनजर करण्यासाठी त्यांनी रेड्डी यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
या पाश्र्वभूमीवर जगनमोहन यांच्या अखत्यारीतील जननी इन्फ्रास्ट्रक्चर लि. तसेच इंडिया सिमेंट कंपनीचे आंध्र प्रदेश व कर्नाटकातील अनेक भूखंडांवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. याखेरीज त्यांच्या मुदत ठेवी व समभागही जप्त करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व एकूण मालमत्तेचे मूल्य २३२.३८ कोटी रुपये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा