ED Busts Noida Couple Porn Racket : नोएडा येथे एका जोडप्याकडून चालवले जात असलेल्या ऑनलाईन पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वल किशोर आणि त्यांची पत्नी नीलू श्रीवास्तव हे दोघे हे रॅकेट गेल्या पाच वर्षांपासून चालवत होते. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय निधीचा देखील समावेश असल्याची बाब समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे संबंध सायप्रसमधील टेक्नियस लिमिटेड (Technius Limited) नावाच्या कंपनीशी होते, ही कंपनी Xhamster आणि Stripchat सारख्या अडल्ट इंटरटेनमेंट वेबसाइट चालवण्यासाठी ओळखली जाते. या जोडप्याने बँकेच्या व्यवहारांमध्ये पर्पज कोडचा विपर्यास करून परदेशातील कंपन्यांना निधी पाठवला. ज्यामध्ये बनावट पद्धतीने हे पैसे जाहिराती आणि मार्केट रिसर्चसाठी दिल्याचे दाखवण्यात आले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या जोडप्याच्या नोएडा येथील घरावर छापा टाकला. तेव्हा या छाप्यात त्यांच्या घरात १५.६६ कोटी रुपयांचा बेकायदेशीर निधी सापडल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान या जोडप्याच्या चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या आहेत. जसे की या प्रकरणातील मुख्य आरोपी उज्ज्वल किशोर हा रशियामध्ये अशाच प्रकारच्या रॅकेटमध्ये सहभागी होता. त्यानंतर तो भारतात परत आला आणि त्याने इथे हा उद्योग सुरू केला.
फेसबूकवरून करायचे भरती
मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषत: फेसबूकच्या माध्यमातून मॉडल्सची भरती केली. या दोघांनी ‘echato dot com’ नावाने पेज सुरू केले होते, ज्याच्या माध्यमातून महिलामना भरघोस पगाराच्या बदल्यात मॉडेलिंगची संधी ऑफर केली जात असे. दिल्ली-एनसीआर भागातील अनेक महिलांना जाहिरातींच्या माध्यमातून हे आमिष दाखवण्यात आले. या महिला ऑडिशनसाठी नोएडा येथील जोडप्याच्या फ्लॅटवर आल्यानंतर त्यांना पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात येत असे. या महिलांना ऑफर केला जाणारा मोबदला हा दर महिना १ ते २ लाखांपर्यंत होता.
ईडीच्या छापेमारीदरम्यान या जोडप्याच्या फ्लॅटमध्ये ओन्लीफॅन्स सारख्या अडल्ट स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर कंटेट ब्रॉडकास्ट करण्यासाठी वापरला जाणारा प्रोशेशनल वेबकॅम स्टूडीओ सेट अप सापडले आहे. यामध्ये उच्च तंत्रज्ञान असलेले ब्रॉडकास्टिंगचे साहित्य आढळून आले आहे. तसेच या छाप्या दरम्यान तीन महिला येथे काम करताना आढळून आल्या होत्या, ज्या त्यावेळी ऑनलाईन होत्या. ईडीने त्या महिलांचे जबाब घेतले आहेत.
काम कसे चालत असे?
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, मॉडल या ग्राहकांनी दिलेल्या पैशांच्या आधारावर काम करत होत्या. त्यांच्याकडून ग्राहकांना वेगवेगळ्या कॅटेगरी ऑफर केल्या जात होत्या, ज्यामध्ये हाफ-फेस शो, फुल-फेस शो आणि फूल न्युडिटी अशा कॅटेगरींचा समावेश होता. या सेवा विकत घेण्यासाठी ग्राहक टोकन खेरदी करायचे, ज्यासाठी कॅटेगरीनुसार रक्कम ठरलेली असे. यातून मिळालेले पैसे मोठ्या प्रमाणात हे जोडपे ठेवून घेत असे. ज्यामध्ये ७५ टक्के पैसे या जोडप्याला तर उरलेले २५ टक्के हे मॉडल्सना मिळत होते.
सुरुवातीला या जोडप्याला ग्राहकांकडून क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे मिळत होते असेही सांगितले जात आहे. तसेच ईडीला नेदरलँड्समधील एक बँक खाते देखील सापडले आहे, जेथे टेक्निअस लिमिटेड या कंपनीनेने ७ कोटी रुपये हस्तांतरित केले होते. हे पैसे नंतर आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड वापरून भारतात काढण्यात आले. तपास यंत्रणेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या रॅकेटद्वारे हजारो महिलांची भरती झाली असण्याची शक्यता आहे.
© IE Online Media Services (P) Ltd