पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आले असताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात पहिले आरोपपत्र दाखल केले असून यात तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रींजय बोस आणि आता निष्क्रिय असलेल्या शारदा समूहाचे अध्यक्ष सुदीप्त सेन यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सुमारे १० हजार पानांचे हे आरोपपत्र येथील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader