मद्यसम्राट विजय मल्या यांना ९ एप्रिलला मुंबईत तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने तिसरे आणि बहुधा अखेरचे समन्स पाठवले आहे. ९०० कोटी रुपयांहून अधिकच्या आयडीबीआय बँक कर्ज घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात त्यांना पाचारण करण्यात आले आहे.
युनायटेड ब्रुअरीजचे अध्यक्ष असलेले मल्या यांना साक्ष देण्यासाठी शनिवारी, २ एप्रिलला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले होते. मात्र या तारखेला हजर राहणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी शुक्रवारी आणखी वेळ मागून घेतला होता. ईडीच्या मुंबई कार्यालयातील तपास अधिकाऱ्याने मल्या यांच्या नावे नव्याने समन्स जारी करून त्यांना ९ एप्रिलला वैयक्तिकरीत्या हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास अधिकाऱ्यांनी मल्या यांना उपस्थित राहण्याची मुदत तांत्रिक व कायदेशीर आधारावर वाढवून दिली असल्यामुळे हे अखेरचे समन्स असू शकेल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा