सक्तवसुली संचालनालयानकडून (ईडी) बुधवारी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईतील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. हा छापा टाकण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ईडीने विनाकारण आपल्या कार्यालयावर छापा टाकल्याची प्रतिक्रिया कार्ती चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी २ डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मित्रांच्या अनेक व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी छापे टाकले होते. छापे टाकण्यात आलेल्या खासगी नेत्र चिकित्सा समूहासह काही कंपन्यांमध्ये कार्ती चिदंबरम यांचे समभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र, माझा किंवा माझ्या कुटुंबातील कोणाचाही या कंपन्यांशी संबंध नसल्याचे कार्ती चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, एअरसेल व मॅक्सिस या कंपन्यांमधील पैशांचे बेकायदेशीर व्यवहार आणि या आस्थापनांनी प्राप्तिकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

Story img Loader