झारखंडमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रेम प्रकाश यांच्या निवासस्थानी छापेमारी केली असून दोन ए. के. ४७ रायफल आणि ६० काडतुसे जप्त केले आहेत. प्रेम प्रकार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार? अशोक गहलोत म्हणाले “त्यांनी माझ्यावर…”
मिळालेल्या माहितीनुसार बेकायदेशीर खाण घोटाळा प्रकरणात ईडीने प्रेम प्रकाश यांच्या झारखंडमधील निवासस्थानावर छापा टाकला. यावेळी एका लोखंडी अलमारीमध्ये दोन ए.के. ४७ रायफल ठेवण्यात आल्या होत्या. हेमंत सोरेन आणि प्रेम प्रकाश यांच्या कथित संबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली. ईडीकडून प्रेम प्रकाश यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त बिहार, तामिळनाडू, दिल्ली येथे अन्य १६ ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री हेमंत सोरन हेदेखील ईडीच्या रडारवर आहेत.
ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार पंकज मिश्रा यांच्यासह 37 बँक खात्यांमधून ११ कोटी ८८ लाख रुपये यापूर्वीच जप्त केले आहेत.