दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) समन्स बजावलं आहे. चौथ्यांदा ईडीनं केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. याआधी केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. बजावलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा केजरीवालांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याआधी केजरीवाल दोन नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारीला ईडीसमोर हजर झाले नव्हते. भाजपा लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी मला अटक करू पाहत आहे, असा आरोप केजरीवालांनी केला होता. “ईडीच समन्य बेकायदेशी असल्याचं माझ्या वकिलांनी सांगितलं होतं. भाजपा मला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी अटक करू पाहत आहे,” असं केजरीवालांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : विश्लेषण : ईडीकडून केजरीवालांना पुन्हा समन्स, त्यांनी येण्यास परत नकार दिला तर?

आता, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं चौथ्यांदा केजरीवालांना समन्स बजावलं आहे. १८ जानेवारीला ( गुरूवारी ) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून केजरीवालांना देण्यात आले आहेत. त्यामुळे केजरीवाल चौकशीसाठी हजर राहतात का? हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीनं आपचे उपमुख्यमंत्री मनिश सिसोदीया आणि खासदार संजय सिंह यांना याआधी अटक केली आहे.