पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी चौथ्यांदा समन्स बजावले. दिल्लीमधील अबकारी धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. केजरीवाल यांना १८ जानेवारीला ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल हे राज्यातील आपचे नेते आणि स्वयंसेवकांशी संवाद साधण्यासाठी १९ आणि २० जानेवारीला गोव्यात असणार आहेत. केजरीवाल यांनी ३ जानेवारीला ईडीसमोर उपस्थित राहण्यास तिसऱ्यांदा नकार दिला होता. ईडीचा ‘कोणतीही माहिती न देण्याचा आणि प्रतिसाद न देण्याचा दृष्टिकोन’ कायदा, निष्पक्षपातीपणा किंवा न्यायाच्या कसोटीवर टिकणारा नाही असे ते म्हणाले होते. आपणच न्यायाधीश, ज्युरी आणि अंमलबजावणी अधिकाऱ्याची भूमिका बजावण्याचा ईडीचा दुराग्रह आहे अशी टीकाही त्यांनी केली होती.

हेही वाचा >>>पेंच व्याघ्र प्रकल्पाची आता नवीन ओळख, या परिसराला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता

ईडीने केजरीवाल यांना ३ जानेवारीपूर्वी मागील वर्षी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबरला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांना बजावलेले समन्स पीएमएलएची कार्यपद्धती आणि कायद्याच्या कक्षेत येणारेच आहे याची ईडीला खात्री आहे.

‘केजरीवाल यांना थांबवण्याचा प्रयत्न’

ईडीने चौथ्यांदा समन्स बजावल्यानंतर, ‘भाजप केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी ईडीचा गैरवापर करत आहे’, अशी टीका आपचे नेते आणि दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी केली.