अमेरिकेतील एका कायदेतज्ज्ञाने एडवर्ड स्नोडेन आणि महात्मा गांधी यांची तुलना केल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्नोडेन हा देशभक्त नसल्याचे म्हटले आहे.
प्रिज्म या अमेरिकेच्या इंटरनेट जालातून हेरगिरी करण्याच्या कार्यक्रमाची माहिती फोडल्याचा आरोप स्नोडेनवर आहे. व्हाईट हाऊस येथे पत्रकारपरिषदेत बराक ओमाबा म्हणाले, “स्नोडेनने प्रिज्मची माहिती फोडून गुन्हा केला आहे. त्यामुळे तो देशभक्त असल्याचे वाटत नाही. त्याला आपण योग्य असल्याचे वाटत असेल, तर त्याने पुन्हा अमेरिकेत यावे आणि न्यायालयासमोर हजर राहून आपली बाजू मांडावी अशी भूमिका केवळ माझी नाही, तर प्रत्येक अमेरिकन नागरिकाची आहे.” 

Story img Loader