बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घुसल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय मच्छीमारांची श्रीलंका न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली.
आपल्या हद्दीत घुसल्याचा आरोप करीत १५ जून रोजी श्रीलंकेच्या नौदलाने आठ भारतीय मच्छीमारांना अटक केली होती. या मच्छीमारांना तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
दरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाने वेगवेगळ्या दिवशी अटक केलेले अन्य ४१ मच्छीमार अद्याप श्रीलंकेच्या ताब्यात आहेत. या मच्छीमारांच्या कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-08-2013 at 03:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight fishers released by sri lanka