गया जिल्ह्य़ातील माजाउलिया गावात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
माओवाद्यांनी आईडी स्फोटकांच्या साहाय्याने दुपारी १२.४० च्या सुमारास पोलिसांची जीप उडवून दिली. या स्फोटात एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह, पाच हवालदार, गावाचे सरपंच आणि एक विशेष पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडल्याची माहिती गयाचे पोलीस अधीक्षक अख्तर हुसैन यांनी दिली. माओवाद्यांविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमासाठी हे पोलीस दल जात होते. स्फोटानंतर माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रेही पळवून नेली.

Story img Loader