देशात मशिदींवरच्या भोंग्याचा वाद कमी होत नाही, तोच पुन्हा सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावरून वाद होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सार्वजनिक ठिकाणी नजाम पठण करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी (SDM) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
निजाम (२२), नसीम (५२), सज्जाद अहमद (५०), मुरसलीन (३८), अशरफ (४५), असगर (३७), मुस्तफा (३५) आणि इकराम (४७), अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. हे सर्व गुरुवारी सायंकाळी नगर कॉलनीतील आठवडी बाजारात ‘नमाज’ पठण करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या सर्वांना अटक केली.
पोलिसांनी आठही जणांविरुद्ध भादंविच्या कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना एनडीएम न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ताकीद देऊन जामीन मंजूर केला आहे.