पाकिस्तानातील सत्तारूढ पीएमएल-एन पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या पंजाब प्रांतातील निवासस्थानाबाहेर बुधवारी एका आत्मघातकी हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात किमान सात जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. मात्र सदर लोकप्रतिनिधी या हल्ल्यातून बचावला.

जेरा गाझी खान जिल्ह्य़ातील तौनसा शरीफ येथे पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य सरदार अमजद खोसा यांचे निवासस्थान आहे. आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडविला त्यावेळी तेथे जवळपास २० ते २५ जण, मुख्यत्वे पक्ष कार्यकर्ते हजर होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader