लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे खडसेंच्या भाजपमधील अधिकृत प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. भाजपच्या अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने खडसेंना विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत तर्क केले जात आहे. खडसेंनीच भाजपप्रवेशाची शक्यता व्यक्त केली होती.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

असे असले तरी अजूनही खडसे भाजपप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे शहांनी खडसेंना भेटीची वेळ दिली नव्हती. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश रखडला होता. मात्र, अनौपचारिकपणे खडसे भाजपवासी झाल्याचे मानले जात आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन व खडसे यांच्यामध्ये समेट घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. दिल्लीत खडसे व शहांच्या भेटीवेळी खडसेंची सून व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांनी युवा व क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.