लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे खडसेंच्या भाजपमधील अधिकृत प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. भाजपच्या अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने खडसेंना विधान परिषदेचे आमदार केले. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खडसेंच्या स्वगृही परतण्याबाबत तर्क केले जात आहे. खडसेंनीच भाजपप्रवेशाची शक्यता व्यक्त केली होती.
असे असले तरी अजूनही खडसे भाजपप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे शहांनी खडसेंना भेटीची वेळ दिली नव्हती. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश रखडला होता. मात्र, अनौपचारिकपणे खडसे भाजपवासी झाल्याचे मानले जात आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन व खडसे यांच्यामध्ये समेट घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. दिल्लीत खडसे व शहांच्या भेटीवेळी खडसेंची सून व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात रक्षा खडसे यांनी युवा व क्रीडा राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.