पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी १४ हजार कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या सुरक्षेसाठी संचलन पथाच्या (कर्तव्य पथ) आसपास तैनात केले जातील.दिल्लीत सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांनी शुक्रवारी एक सल्लावजा सूचना जारी केली असून, त्यात दिल्लीतील या दिवशीची वाहतूक व्यवस्था आणि निर्बंधांची माहितीही दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की यंदाचे संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावर येणाऱ्या सुमारे ७७ हजार निमंत्रितांसाठी व्यापक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. विशेष पोलीस आयुक्त (सुरक्षा) दीपेंद्र पाठक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व जिल्हा शाखा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने काम करत आहेत. कमांडो, शीघ्र प्रतिसाद दल, ‘पीसीआर व्हॅन’, तोडफोड विरोधी पथक आणि ‘स्वॅट’ पथके विविध मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिसांनी हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठीची यंत्रणाही सज्ज केली आहे. सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ानंतर दिल्लीतील संवेदनशील भागात शांतता राखली जाईल, यासाठीची उपाययोजना पोलिसांनी केली असल्याचे पाठक यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सुमारे ७७ हजारांवर निमंत्रित उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.