निवडणुका आल्या की मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या नवनवीन क्लृप्त्या राजकीय पक्षांकडून वापरल्या जातात. तसेच प्रचार अंतिम टप्प्यात आल्यावर काही प्रतीकात्मक वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र यामुळे आचारसंहितेचा भंग होतो का किंवा कसे याबाबत प्रत्येक वेळीच संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानेच पाऊल उचलले आहे.  मतदारांना प्रचारादरम्यान टोप्या, पक्षाचे झेंडे, निशाण्या, स्टिकर्स अशा लहानलहान वस्तूंचे वाटप करण्यास आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र त्याच वेळी सदर खर्चाचा तपशील आपल्या खर्च विवरण पत्रात नमूद करण्यासही आयोगाने बजावले आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पक्ष कार्यकर्त्यांनी प्रतीके परिधान करण्यासही आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील पक्षातर्फे करण्यात आलेल्या खर्चात समाविष्ट करण्यात यावा, असे स्पष्ट केले आहे.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाटण्यात येणाऱ्या लहान-लहान गोष्टींबाबत आचारसंहितेमध्ये असलेली संदिग्धता दूर करावी, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.
* काय चालेल?
टोप्या, स्टिकर्स, हेडबँड, रिस्टबँड, बिल्ले, रिक्षांवर लावले जाणारे पोस्टर्स.
* मात्र यास बंदीच..
टी-शर्ट, शर्ट, अन्य कपडे आणि अन्य किमती वस्तू.
तसेच निवडणुकीच्या दिवशी परवानगी असलेल्याही वस्तूंचा मतदान
केंद्रापासून १०० मीटर परिसरात वापर करणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commision permits voters to wear cap
Show comments