स्थलांतरित मतदारांचा सहभाग सुधारण्यासाठी आणि शहरी तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगसाठी मंगळवारी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की स्थलांतरित मतदारांच्या समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती राजकीय पक्षांचा सल्ला देखील घेईल. विशेष म्हणजे निवडणूक आयोग गेल्या काही वर्षांपासून रिमोट वोटिंगसाठीच्या संकल्पनेवर विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिमोट मतदान सुरू करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या लोकसंख्येचे मॅपिंग सुरू करण्याची योजना आखली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखालील आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह आयोगाने, उत्तराखंडमधील एका दुर्गम मतदान केंद्राला तासभर भेट दिल्यानंतर यासंदर्भातील एक निर्णय घेतला आहे. देशातील ४४० दुर्गम मतदान केंद्रांवर तीन दिवस अगोदर प्रवास करणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांचे प्रयत्न ओळखून, आयोगाने अशा अधिकाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी वाढीव मोबदल्यासाठी अशी मतदान केंद्रे निवडतील. कुमार यांनी शुक्रवारी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील दुमक या राज्यातील सर्वात दुर्गम मतदान केंद्राला भेट दिली होती.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

“मतदार त्यांच्या मतदानाच्या नोंदणीच्या ठिकाणाहून शहरे आणि इतर ठिकाणी शिक्षण, रोजगार आणि इतर कारणांसाठी स्थलांतर करतात. त्यांना मतदान करण्यासाठी त्यांच्या नोंदणीकृत मतदान केंद्रावर परत जाणे कठीण होते. आयोगाचे मत आहे की दूरस्थ मतदानाच्या शक्यता तपासण्याची वेळ आली आहे आणि हे प्रायोगिक तत्त्वावर केले जाऊ शकते,” असे निवेदनात म्हटले आहे.

स्थलांतरित मतदारांच्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत अवघड भागात ईव्हीएम-व्हीव्हीपीएटीच्या सुरक्षित वाहतुकीसाठी अतिरिक्त उपकरणे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Story img Loader