गुजरात विधानसभा निवडणूक उशिरा जाहीर केल्याचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यामुळे आयोगाने उशिरा गुजरात निवडणुकींची घोषणा केली असाही आरोप करण्यात आला. याबाबत थेट मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनाच प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (३ नोव्हेंबर) नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजीव कुमार म्हणाले, “निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि स्वतंत्रता याबाबतच्या प्रश्नांवर मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही, तर आमच्यावरील शंका कायम राहील. गुजरात निवडणुकीच्या घोषणेला उशीर केल्याचा आरोप झाला. मात्र, निवडणूक घोषित करताना अनेक गोष्टींचं संतुलन राखावं लागतं. यात गुजरात आणि हिमाचल प्रदेश दोन्ही राज्यांचे एकत्रित निकाल देण्याची परंपरा आहे, दोन्ही राज्यांच्या विधानसभांची मुदत संपण्याच्या वेगवेगळ्या तारखा असे अनेक मुद्दे विचारात घेण्यात आले.”

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

“निकाल आणि विधानसभेची मुदत संपण्यात ७२ दिवसांचं अंतर”

“या प्रकरणाचा विचार केला तर गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ ही आहे. त्याच्या ११० दिवस आधी निवडणुकीची घोषणा होत आहे. ही घोषणा पुरेशी अगोदर आहे. ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे आणि मुदत १८ फेब्रुवारीला संपणार आहे. निकाल आणि विधानसभेची मुदत संपण्यात ७२ दिवसांचं अंतर आहे,” असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

“…म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा उशिरा”

मोदींच्या दौऱ्यामुळे गुजरात निवडणुकीची घोषणा उशिरा केली या आरोपावर राजीव कुमार म्हणाले, “गुजरात निवडणुकीची घोषणा उशिरा होण्यामागे अनेक कारणं आहेत, त्यातील काही कारणांचा उल्लेख आधी केलाय. नुकतीच गुजरातमध्ये एक दुःखद घटना घडली. याशिवाय विधानसभेची मुदत आणि इतर अनेक कारणांनी गुजरात निवडणुकीची घोषणा उशिरा झाली.”

निवडणूक आयोग निष्पक्ष आहे, मात्र त्यांनी तीन माकडांची चित्रं लावली आहे, अशी टीका काँग्रेसने केल्याचा आरोप आहे. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “आमच्या कृती आणि निकाल कोणत्याही शब्दांपेक्षा अधिक बोलक्या आहेत. मी तुम्हाला बोलून कितीही समजून सांगण्यापेक्षा आमच्या कृती आणि निकाल योग्य आहेत की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. निवडणुकीचे निकाल योग्य नाही असं म्हणणं भारतीय मतदारांचा खूप मोठा अपमान आहे. “

“निकालानंतर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पश्चाताप”

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक निवडणुका झाल्यात. मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुका झाल्या. यात ज्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांना आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. ज्या पक्षाने किंवा उमेदवाराने काही प्रश्न उपस्थित केले, तेव्हा निकाल आल्यानंतर त्यांना असे प्रश्न उपस्थित करायला नको होते असं वाटलंय. कारण त्यांच्या बाजूने निकाल आले आहेत,” असं मत राजीव कुमार यांनी व्यक्त केलं.

“…तेच ईव्हीएम आरोप करणाऱ्या पक्षांना जिंकून देतात”

राजीव कुमार पुढे म्हणाले, “आम्ही अशा अनेक घटना सांगू शकतो. निवडणूक सुरू होण्याआधी लांबलचक पत्रे येतात आणि ईव्हीएम मशीन खराब आहेत, ते बदला अशी तक्रार येते. तेच ईव्हीएम आरोप करणाऱ्या पक्षांना जिंकून देतात. त्यानंतर ते प्रश्न उपस्थित करणं बंद होतं. त्यानंतर ते निकाल स्वीकारले जातात.”

“निवडणुकीआधी आयोगाविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं”

“निवडणूक आयोगाची मोठी परंपरा आहे. आयोग आज निर्माण झालेला नाही. आतापर्यंत जेवढे निकाल देण्यात आलेत त्याचीच ही ताकद आहे. काही दिवसांपूर्वीच ईव्हीएमवर एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि त्यात भारतीय निवडणूक आयोगालाही बोलावण्यात आलं होतं. जगभरात निवडणूक आयोगांविषयी निवडणुकीआधी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं. त्याची आम्हाला कल्पना आहे,” असं राजीव कुमार यांनी म्हटलं.

हेही वाचा : “निवडणूक आयोगाने तीन माकडांची चित्रं लावलीयेत”, निष्पक्षतेवरून काँग्रेसच्या आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर, म्हणाले…

“सामना हरल्यानंतर पराभूत संघ पंचांनाही दोष देतो”

“क्रिकेटमध्ये सामना हरल्यानंतर पराभूत संघ पंचांनाही दोष देतो. इथं तर कोणीही थर्ड अंपायर नाही ज्याच्याकडे आपण बॉल टू बॉल पाहू शकू. मात्र, निवडणुकांचे निकाल हाच निष्पक्षतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. हा आधीच्या सर्व निवडणूक आयुक्तांनी निर्माण केलेला आमचा वारसा आहे. आम्ही हा वारसा असाच पुढे नेऊ,” असंही राजीव कुमार यांनी नमूद केलं.