दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच आता निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांवरही नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. पत्रकार परिषदांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून कोणते भाष्य केले जाते, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतो आहे का, याची पाहणी आयोगाचे प्रतिनिधी करणार आहेत. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधीही पत्रकार परिषदांना उपस्थित राहणार असल्याचे बुधवारी काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी स्पष्ट केले.विविध राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे आणि रोड-शो यावर निवडणूक आयोग यापूर्वीपासूनच लक्ष ठेवून आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
आता पत्रकार परिषदांवरही नजर
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच आता निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांवरही नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 29-01-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission eye on press conference