Telangana Election 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी कर्नाटक सरकारला नोटीस पाठवली आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे तेथे आचारसंहिता लागू असतानाही वर्तमानपत्रातून सरकारी जाहिरात केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारला सांगितले आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटक सरकारने तेलंगणातील वृत्तपत्रात सरकारच्या कामगिरीबाबत जाहिरात केली होती. ही जाहिरात भाजपा आणि भारत राष्ट्र समितीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. ही जाहिरात म्हणजे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘हैदराबादचे भाग्यनगर करणार,’ भाजपाच्या आश्वासनावर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जनता भाजपाला…”

निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारला आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यास आणि अशा कोणत्याही जाहिराती त्वरित प्रभावाने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात ऑक्टोबरमधील त्यांच्या सूचनेचाही हवाला देण्यात आला आहे. मतदान न करणार्‍या राज्यांनी मतदान होत असलेल्या राज्यांमध्ये तेथे प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करताना दिल्या होत्या.

कर्नाटकमधील माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या प्रभारी सचिवांवर आदर्श आचारसंहितेनुसार आवश्यक असलेल्या प्रक्रियेचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करण्यात आली नाही, असेही निवडणूक आयोगाने विचारले आहे.
३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस महत्त्वाची आहे. आता यावर कर्नाटकातील काँग्रेस सरकार काय उत्तर देईल याकडे सर्वांचं लक्ष आहे.