Gujarat Assembly Election Dates : भारतीय निवडणूक आयोग आज (१४ ऑक्टोबर) गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी ३ वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यातच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ही पत्रकार परिषद घेणार आहेत.

गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ ला संपते आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत ८ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे ४५ आमदार आहेत, तर काँग्रेसचे २० आमदार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
shivsena ubt vinod ghosalkar vs bjp manisha Chaudhary
Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
maharashtra assembly election 2024 polarization of buddhist vs hindu dalit votes in umred nagpur constituency
उमरेडमध्ये बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

दरम्यान, सप्टेंबरमध्येच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशला भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. गुजरातमध्ये त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

हेही वाचा : “हे तोंडाचं गटार…”, मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हटल्याने स्मृती इराणी संतापल्या, त्यांच्या ९९ वर्षीय आईचा उल्लेख करत केजरीवालांना सुनावलं

दोन्ही राज्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला की, लगेचच आचार संहिता लागू होईल. यानंतर राजकीय प्रचाराला जोरदार सुरुवात होईल.