Premium

Election Commission : मोठी बातमी! निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, राजकीय वर्तुळाचं लक्ष; कोणती घोषणा करणार?

भारतीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

Election Commission of India
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Election Commission of India : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (दि.१६ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता दिल्लीमध्ये महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक अर्थात निवडणुकीच्या तारीखा जाहीर करण्यात येणार आहेत. पण यामध्ये जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.

navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
ED raids Maharashtra, maharashtra assembly election 2024
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

हेही वाचा : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार का?

केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याच्या यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने एक ट्विट केलं आहे. पण यामध्ये नेमकी कोणत्या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातात हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचीही घोषणाही होणार का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत देखील निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हे आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होणार आहे.

३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा होणार

जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बाबत गेल्या वर्षी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ अगोदर घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्मू काश्मीरचा दौरा करत तयारीचा आढावा घेतला होता. दरम्यान, ३७० कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीरच्या निवडणुकीबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election commission of india will announce the dates for the assembly elections 2024 today gkt

First published on: 16-08-2024 at 09:10 IST

संबंधित बातम्या