Gujarat Assembly Election 2022 Date : गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…

Live Updates

Gujarat Assembly Election 2022 Updates : गुजरात निवडणुकीबाबत प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स... 

12:43 (IST) 3 Nov 2022
गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम - दुसरा टप्पा

दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम -

नोटिफिकेशन - १० नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख - १७ नोव्हेंबर

अर्जांची छाननी - १८ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - २१ नोव्हेंबर

मतदान - ५ डिसेंबर

दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल - ८ डिसेंबर

12:43 (IST) 3 Nov 2022
गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम - पहिला टप्पा

पहिला टप्पा निवडणूक कार्यक्रम -

नोटिफिकेशन - ५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख - १४ नोव्हेंबर

अर्जांची छाननी - १५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - १७ नोव्हेंबर

मतदान - १ डिसेंबर

12:31 (IST) 3 Nov 2022
हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी

हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीचं मतदान वेगवेगळ्या दिवशी, मात्र निकाल एकाच दिवशी, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

12:28 (IST) 3 Nov 2022
गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार, निवडणूक आयोगाची घोषणा, १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला मतदान, तर ८ डिसेंबरला मतदान होणार

https://twitter.com/ANI/status/1588062853939929088

12:21 (IST) 3 Nov 2022
गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार मताचा अधिकार बजावणार

गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार मताचा अधिकार बजावणार, ४.६१ लाख तरुण मतदार, ३.२४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार, महिलांसाठी १२७४ मतदान केंद्रे, दिव्यांगांसाठी खास १८२ मतदान केंद्रे, ५० टक्के केंद्रांचं लाईव्ह प्रक्षेपण - निवडणूक आयोग

https://twitter.com/ANI/status/1588059920351387648

12:13 (IST) 3 Nov 2022
हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत विशेष निरिक्षकांची नियुक्ती करणार - आयोग

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आगामी हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत महिला आणि ज्येष्ठांच्या सहभागासाठी विशेष निरिक्षकांची नियुक्ती केली जाईल."

https://twitter.com/ANI/status/1588058200372191233

12:01 (IST) 3 Nov 2022
थोड्याच वेळात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता

थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता, आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष

11:39 (IST) 3 Nov 2022
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या परंपरेत खंड

सामान्यत: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकत्रच तारखा जाहीर होऊन मतदान होत असतं. या परंपरेला यावर्षी फाटा देण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाने म्हटलं, " हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे."

11:38 (IST) 3 Nov 2022
गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपणार

गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत.

11:37 (IST) 3 Nov 2022
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता

गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातवर गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून घेरलं जात आहे.

सविस्तर बातमी...

Gujarat assembly election 2022 schedule

गुजरात निवडणूक २०२२  तारखेची घोषणा

Story img Loader