Gujarat Assembly Election 2022 Date : गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Gujarat Assembly Election 2022 Updates : गुजरात निवडणुकीबाबत प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
दुसरा टप्पा निवडणूक कार्यक्रम –
नोटिफिकेशन – १० नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर
अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर
मतदान – ५ डिसेंबर
दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – ८ डिसेंबर
पहिला टप्पा निवडणूक कार्यक्रम –
नोटिफिकेशन – ५ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर
अर्जांची छाननी – १५ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर
मतदान – १ डिसेंबर
हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीचं मतदान वेगवेगळ्या दिवशी, मात्र निकाल एकाच दिवशी, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार, निवडणूक आयोगाची घोषणा, १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला मतदान, तर ८ डिसेंबरला मतदान होणार
First phase of Assembly elections in Gujarat to be held on 1st December & second phase on 5th December; counting of votes to be done on 8th December: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/MMgTpxOY4W
— ANI (@ANI) November 3, 2022
गुजरातमध्ये ४.९ कोटी मतदार मताचा अधिकार बजावणार, ४.६१ लाख तरुण मतदार, ३.२४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार, महिलांसाठी १२७४ मतदान केंद्रे, दिव्यांगांसाठी खास १८२ मतदान केंद्रे, ५० टक्के केंद्रांचं लाईव्ह प्रक्षेपण – निवडणूक आयोग
For enhanced voting experience, 1274 polling stations will be completely managed by women & security staff. There will be 182 polling stations where one will be welcomed by PWD. For the 1st time, 33 polling stations will be set up &managed by youngest available polling staff: CEC pic.twitter.com/UZ0F2qfwOE
— ANI (@ANI) November 3, 2022
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आगामी हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत महिला आणि ज्येष्ठांच्या सहभागासाठी विशेष निरिक्षकांची नियुक्ती केली जाईल.”
A special observer in Himachal Pradesh & Gujarat for accessibility & inclusion for women, elderly, PWD will be deployed in the forthcoming #Assembly elections: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/JF6BUwmvZZ
— ANI (@ANI) November 3, 2022
थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची शक्यता, आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष
सामान्यत: हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकत्रच तारखा जाहीर होऊन मतदान होत असतं. या परंपरेला यावर्षी फाटा देण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाने म्हटलं, ” हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे.”
गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातवर गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून घेरलं जात आहे.