लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकते त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच पदभार आहे. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्ताशिवाय इतर दोन आयुक्त असतात. आधी एक पद रिक्त होतं त्यानंतर आता अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ही दोन्ही पदं रिक्त झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरूण गोयल यांचा राजीनामा मंजूर

लोकसभा निवडणूक पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. आता निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठीची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे. निवडणूक तयारी कशी सुरु आहे यासाठी अरूण गोयल यांनी राजीव कुमार यांच्यासह काही राज्यांचा दौरा केला होता. आता अचानक त्यांनी तडकाफडकी आपलं पद सोडलं आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ९ मार्च २०२४ म्हणजेच आजपासूनच हा राजीनामा स्वीकारला गेल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- पंकजा मुंडे लोकसभा लढविणार? सूचक विधान करताना म्हणाल्या, “आता लोकसभेची काळजी…”

अरूण गोयल यांची नियुक्ती वादात

अरूण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएस अधिकारी आहेत. १८ नोव्हेंबर २०२२ ला त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेचच म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२२ ला निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांची नियुक्ती वादात अडकली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आलं होतं. अरूण गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे तर मग त्यांना इतक्या तातडीने निवडणूक आयुक्तपद का दिलं गेलं? असं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारलं होतं.