काठमांडू : नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्ककमल दहल ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वाखालील कमजोर आघाडी सत्तेवर असल्याने अस्थैर्य वाढत असतानाच, नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.
नेपाळी काँग्रेस व पंतप्रधान प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन (माओइस्ट सेंटर) यांचा समावेश असलेल्या आठ पक्षांच्या आघाडीचे उमेदवार असलेले पौडेल यांना संसदेतील लोकप्रतिनिधींची २१४ मते आणि प्रांतिक विधानसभा सदस्यांची ३५२ मते मिळाली. आठ पक्षांच्या पाठिंब्यामुळे ७८ वर्षांचे पौडेल यांचा विजय निश्चित होता. त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाषचंद्र नेबमांग यांना माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल पक्षाचा पाठिंबा होता.