राजकीय धुरीण याईर लॅपिड हे किंगमेकर म्हणून उदयास आल्याने इस्राएलच्या निवडणुकीत विजयोत्सव साजरे करण्याचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे स्वप्न भंगले आहे. सत्तारूढ लिकूड पक्षाला अखेरच्या क्षणी निर्णायक मतदारांनी चांगलाच झटका दिला. तरीही मित्रपक्षांच्या साथीने नेतान्याहू हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची लक्षणे दिसत आहेत.
विद्यमान पंतप्रधान नेतान्याहूच पुन्हा बाजी मारणार, असा निर्वाळा चाचणीत देण्यात आला होता. मात्र अखेरच्या क्षणी बदललेल्या जनमताने या चाचण्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे आता नेतान्याहू आणि अन्य पक्षांची युती सत्तेवर येईल, अशी शक्यता इस्राएलमधील माध्यमांकडून वर्तविली जात आहे.तथापि, नेतान्याहू यांनी हा निकाल म्हणजे आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब असल्याचे म्हटले असून आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी त्वरित हालचाली सुरू केल्या आहेत. या आघाडीमध्ये उजवे, डावे आणि मध्यममार्गावरील पक्षांचा समावेश असेल.या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लेबर पक्षाच्या नेत्या शेली यासिमोविच यांनी लॅपिड यांना नेतान्याहू सरकारमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक-आर्थिक प्रश्नांवर पर्याय देण्यासाठी आपल्यासमवेत यावे, असे आवाहनही शेली यासिमोविच यांनी लॅपिड यांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा