सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांना घटनाबाह्य ठरवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देणगीदारांची यादी प्रसृत केली आहे. त्यामुळे आता निवडणूक रोख्यांच्या लाभार्थी पक्षांची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देशात सर्वाधिक शक्तिमान असलेल्या भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक लाभ झाला आहे. निवडणूक रोख्यांसदर्भात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांमधील निवडणूक रोख्यांपैकी ४७.५ टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपाने वटवले आहेत. १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या काळात भाजपने ६०६०.५ कोटी मूल्यांचे रोखे वटवले म्हणजेच त्यांचे रोखीत रुपांतर केले. भाजपासह तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि दक्षिण भारतातल्या पक्षांनाही भरघोस देणग्या मिळाल्या आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणूक रोखे वटवणाऱ्या पक्षांची यादी सादर केली आहे. त्याचबरोबर निववडणूक रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची यादीदेखील प्रसिद्ध केली आहे. यामध्ये हब पॉवर कंपनीचाही समावेश आहे. या हब पॉवर कंपनीच्या देणग्यांचा उल्लेख करत समाजमाध्यमांवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, ही हब पॉवर कंपनी पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत आहे. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानमधील हब पॉवर लिमिटेड कंपनीने भारतातल्या राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. पुलवामा हल्ल्याच्या एक आठवड्यानंतर हब पॉवरने भारताल्या राजकीय पक्षाला देणगी दिली आहे. परंतु, लोकसत्ताने या मेसेजमधील दावे तपासून पाहिले आणि हे दावे चुकीचे असल्याचं आढळलं आहे. कारण ही पाकिस्तानी कंपनी नसून भारतातली नोंदणीकृत कंपनी आहे.

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
Demand to the judges to withdraw the ban on single use plastic in the court premises Mumbai print news
न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

व्हायरल होत असलेली पोस्ट

हब पॉवर कंपनी पूर्व दिल्लीतल्या गांधीनगरमध्ये नोंदणीकृत आहे. जीएसटीच्या (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स) अधिकृत संकेतस्थळावर आम्ही या कंपनीची माहिती तपासली आहे. या कंपनीची जीएसटीच्या पोर्टलवर २०१८ मध्ये नोंदणी करण्यात आली आहे.

जीएसटीच्या संकेतस्थळावरील माहिती

निवडणूक रोख्यांबाबत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार हब पॉवर कंपनीने ९५ लाख रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. १८ एप्रिल २०१९ रोजी या रोख्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी देशात लोकसभा निवडणूक होत होती. तसेच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काहीच दिवस उलटले होते.

हब पॉवरने खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती

हे ही वाचा >> तुम्हालाही पैसे मागितलेले? राजकीय पक्षांना कोट्यवधींचं दान देणाऱ्या उद्योजिकेचं थेट उत्तर, म्हणाल्या…

देशातले टॉप २० देणगीदार

  1. १३६८ कोटी – फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड – लॉटरीचा व्यवसाय करणारी ही कंपनी १९९१ साली स्थापन झाली असून त्यांचं मुख्यालय तामिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये आहे.
  2. ९६६ कोटी – मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड – १९८९ साली स्थापन झालेली ही कंपनी धरणे व ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून तेलंगणात मुख्यालय आहे.
  3. ४१० कोटी – क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड – २००० साली स्थापन झालेली ही कंपनी लॉजिस्टिक्स आणि माल पुरवठा सुविधांच्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.
  4. ३७७ कोटी – हल्दिया एनर्जी लिमिटेड – पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये या कंपनीच्या मालकीचा थर्मल पॉवर प्लांट आहे. २०१५मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं पुढच्या पाच वर्षांत तब्बल ३७७ कोटींची देणगी राजकीय पक्षांना दिली आहे!
  5. ३७६ कोटी – वेदांता लिमिटेड – खाण उद्योगात देशातलं अग्रगण्य नाव असलेल्या या कंपनीची स्थापना १९६५ साली झाली. वेदांता देशातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे.
  6. २२५ कोटी – एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड – मुंबईतली ही कंपनी कच्च्या लोखंडाच्या खाणकाम उद्योगात कार्यरत असून १९५० साली स्थापन झाली आहे.
  7. २२० कोटी – वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी – ऊर्जेचं उत्पादन आणि वितरण या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून २००९ साली स्थापन झाली आहे.
  8. १९८ कोटी – भारती एअरटेल – १९९५ साली स्थापन झालेली भारती एअरटेल कंपनी मोबाईल नेटवर्किंगच्या क्षेत्रात कार्यरत असून कंपनीचं मुख्यालय दिल्लीत आहे.
  9. १९५ कोटी – केवेंतर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड – डेअरी आणि FMCG उत्पादनांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे.
  10. १९२ कोटी – एमकेजे एंटरप्रायजेस लिमिटेड – स्टेनलेस स्टील व्यवसायात मोठं नाव असणारी ही कंपनी १९८२ साली स्थापन झाली असून कंपनीचं मुख्यालय कोलकात्यात आहे.
  11. १८६ कोटी – मदनलाल लिमिटेड
  12. १६२ कोटी – यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
  13. १४६ कोटी – उत्कल अॅल्युमिनियम इंटरनॅशनल लिमिटेड
  14. १३० कोटी – डीएफएल कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड
  15. १२३ कोटी – जिंदाल स्टील अँड पॉवर्स लिमिटेड
  16. ११९ कोटी – बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लमिटिडेड
  17. ११५ कोटी – धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
  18. ११३ कोटी – अवीस ट्रेडिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
  19. १०७ कोटी – टोरंट पॉवर लिमिटेड
  20. १०५ कोटी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

Story img Loader