Birth Control Shots To Limit Population : मानव-हत्तींमधील संघर्ष वाढल्याने थायलंडने मोठा निर्णय घेतला आहे. थायलंड सरकारने काही प्रमाणात वन्य मादी हत्तींसाठा कुटंब नियोजनाचा प्रस्ताव मांडला आहे. १९८६ पासून आशियाई हत्तींना धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. परंतु थाई अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की संवर्धन प्रयत्नांमुळे देशात हत्तींची संख्या दरवर्षी ८% दराने वाढत आहे. यामुळे जंगलांमध्ये त्यांचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी हत्ती लोकवस्तीत शिरून माणसांना त्रास देतात. त्यांच्या शेती आणि घरांचं नुकसान करत असून यामुळे मानवी मृत्यूही वाढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री चालेरमचाई श्री-ऑन म्हणाले की, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव आणि वनस्पती संवर्धन विभाग (DNP) आणि संबंधित क्षेत्रांना वन्य हत्तींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा उपाय अवलंबण्याचे आदेश दिले आहेत. थायलंडमध्ये किमान ४ हजार वन्य हत्ती आहेत, ज्यांचा जन्मदर दरवर्षी ७-८% ने वाढत आहे. पुढील चार वर्षांत वन्य हत्तींची संख्या किमान ६ हजारपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. वनक्षेत्र कमी होत असताना हत्तींची संख्या वाढल्याने मानवी संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पूर्वेकडील भागात पायलट चाचणी घेणार

२०१२ पासून जंगली हत्तींच्या हल्ल्यात किमान २४० लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि २०८ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वनस्पती संवर्धन विभाग आता लोकसंख्या नियंत्रण उपायांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करत आहे. पुढील महिन्यात पूर्वेकडील भागातील सीमावर्ती जंगलांमध्ये हत्तींना लक्ष्य करून चाचणी घेतली जाईल. जर पायलट प्रयत्न यशस्वी झाला तर हा उपाय इतर क्षेत्रांमध्येही विस्तारला जाईल असे मंत्र्यांनी सांगितले.

या चाचणी हत्तींच्या शरीरावर काय परिणाम होणार?

मादी हत्तींना लक्ष्य करून घेतलेला स्पायव्हॅक लसीकरण सात वर्षांपर्यंत गर्भनिरोधक परिणाम देते. हे लसीकरण हत्तींच्या वर्तनात किंवा शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करत नाही, तर फक्त त्यांच्या संप्रेरक पातळीचे नियमन करते जेणेकरून त्यांना गर्भधारणा होऊ नये. एप्रिलमध्ये सात मादी हत्तींवर हे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत, असे त्यांनी सांगितले. “हा उपक्रम जंगली हत्तींचे संवर्धन करताना वनजमिनीजवळ राहणाऱ्या शेकडो लोकांना सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो”, असे अट्टापोल म्हणाले.