Yahya Sinwar Eliminated by IDF : गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध चालू आहे. या युद्धात चाळीस हजारांहून अधिकांचे प्राण गेलेत, तर लाखो लोक स्थालंतरित झाले आहेत. दरम्यान, आता हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची लष्करी सेना आयडीएफने दिली आहे. तसंच, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायल क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता. याह्या सिनवार हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने हमासविरोधातील हल्ले वाढवले होते. सातत्याने हवाई हल्ले केले जात आहे. आज, गुरुवारीही दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात तीन दहशतावाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यापैकी एक याह्या सिनवार होता.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

हेही वाचा >> हमास-इस्रायल संघर्ष वर्षभरातच संभाव्य इस्रायल-इराण लढाईपर्यंत कसा पोहोचला? पश्चिम आशियात व्यापक युद्धभडक्याची शक्यता?

इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर तीन दहशतवादी ठार केल्याची माहिती सुरुवातीला दिली होती. परंतु, यात याह्या सिनवार मारला गेला की नाही, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नव्हती. सुरुवातीला इस्रायलच्या लष्कराने म्हटलं होतं की, “आम्ही हमासच्या तीन दहशतावाद्यांना लक्ष्य केलं होतं. त्यापैकी एक हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ( Hamas chief Yahya Sinwar ) असू शकतो. सध्या कुठले दहशतवादी मारले गेले आहेत त्यासंदर्भातली ओळख पटलेली नाही. मात्र शक्यता आहे की हमासचा म्होरक्या याह्या सिनावरचा यामध्ये मृत्यू झाला.”

दरम्यान काही वेळाने आयडीएफनेच याबाबत दुजोरा दिला. याह्या सिनवार मारला गेला, असं आयडीएफने सांगितलं. तसंच, “७ ऑक्टोबरच्या नरसंहार आणि अत्याचाराला जबाबदार असलेला खूनी याह्या सिनवारला आज IDF सैनिकांनी ठार मारले”, असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री कॅटझ यांनी एका निवेदनात म्हटले.

युद्ध संपलेलं नाही

“याह्या सिनवार याच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेत आता शांतता प्रस्थापित होईल. परंतु गाझामधील युद्ध संपलेलं नाही. ओलिस इस्रायलमध्ये परत येत नाहीत, तोवर युद्ध सुरूच राहील”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला.