टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय. यासह मस्क ट्विटरमधील ९.२ टक्के हिश्शासह सर्वात मोठा समभागधारक झालाय. विशेष म्हणजे एलन मस्ककडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभाग आले आहेत. मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे एलन मस्कने याआधी ट्विटरवर एक पोल घेतला. त्यात त्याने आपल्या ८ कोटी फॉलोवर्सला ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुल्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असा प्रश्न विचारला. तसेच सर्वांना काळजीने मतदान करावं कारण या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे असंही म्हटलं होतं. या मतदानात ७० टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर एलन मस्कने ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का असं विचारलं. तसेच मी माझा स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत गंभीर विचार करत आहे, असंही नमूद केलं.

हेही वाचा : “हॅकर्स स्टारलिंक इंटरनेट सिस्टिम हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत”, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एलन मस्क यांचं मोठं वक्तव्य

मस्ककडे ट्विटरच्या सहसंस्थापकाच्या चारपट समभागाची मालकी

यानंतर एलन मस्कने आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे का? अशीही विचारणा आपल्या फॉलोवर्सला केली. मस्क एक उत्साही ट्विटर युजर आहे. मात्र, तो ट्विटरचा कठोर टीकाकारही आहे. आता ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क आगामी काळात ट्विटरमधील ७३.४८ मिलियनचे समभाग विकत घेईल. यासह त्याच्याकडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभागाची मालकी येईल. एलन मस्क रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही समभाग खरेदी होईल.

Story img Loader