जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क (Elon Musk) यांनी टेस्लाचे ७ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स दान केले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्येच एलोन मस्क यांनी ही देणगी दिली. अमेरिकेच्या सेक्युरिटी अँड एक्सचेंड कमिशनच्या माहितीतून ही बाब समोर आलीय. एलोनने १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या काळात एकूण ५.०४ मिलियन (७ अब्ज डॉलर) डॉलर्स सेवाभावी संस्थेला दान केले. ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या देणगीपैकी एक आहे.
एलोन मस्कने मागील वर्षी ट्विटरवर टेस्लातील आपले १० टक्के विक्रीबाबत मतदान घेतलं. यात बहुसंख्य लोकांनी होकारार्थी मत नोंदवलं. अमेरिकेचे खासदार बर्नी सँडर्स आणि एलिझाबेथ वॉरेन यांनी गर्भश्रीमंत लोक कशी करचोरी करतात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच एलोन मस्क, बेझोस यांच्यासारख्या श्रीमंत उद्योगपतींवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अमेरिकेत यावर चर्चेला उधाण आलं.
एलोन मस्ककडून १० टक्के शेअर्स एका सेवाभावी संस्थेला दान
यानंतर एलोन मस्कने हा ट्विटर पोल घेतला. तसेच बहुतांश लोकांनी मस्कच्या शेअर विक्रीला होकारार्थी उत्तर दिल्यानंतर त्याने त्या १० टक्के शेअर्स एका सेवाभावी संस्थेला दान केले. मस्कने ही देणगी देताना म्हटलं होतं की मला माझ्या कराचा वाटा देण्यासाठी माझे शेअर्स विकावे लागतील. कारण मी कुठुनही रोख पगार किंवा बोनस घेत नाही.
हेही वाचा : जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क
नेमकं प्रकरण काय?
बर्नी सँडर्स यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये श्रीमंतांनी त्यांचा योग्य कर वाटा द्यावा अशी मागणी केली होती. यावर एलोन मस्क यांनी सँडर्स यांच्या वयावर टोला लगावत तुम्ही जीवंत असल्याचं मी कायम विसरत असतो, असं म्हटलं. तसेच तुम्हाला मी माझे आणखी शेअर्स विकावे असं वाटतं का? असा प्रश्न केला.