जगातील सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्याबाबत धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वॉल स्ट्रिट जर्नलने एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार मस्क हे कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करता, असा आरोप ठेवण्यात आला आहे. स्पेसएक्सच्या एका माजी शिकाऊ महिला कर्मचाऱ्याशी मस्क यांनी लैंगिक संबंध ठेवले तर दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला आपल्या मुलांना जन्म देण्यास दबाव टाकला, असे नानाविध आरोप एलॉन मस्क यांच्यावर करण्यात आले आहेत.

स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संचालक मंडळासमोरच एलॉन मस्क अमली पदार्थांचे सेवन करायचे, असाही एक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच मस्क यांनी आपल्या कंपन्यात महिला कर्मचाऱ्यांचा लाभ उठविण्याची एक व्यवस्था निर्माण केली असल्याचेही बोलले जात आहे.

Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
actor amit tandon cheated wife ruby tandon
पत्नीची अनेकदा फसवणूक केली, अभिनेत्याचा स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल खुलासा; घटस्फोट घेतल्यावर सहा वर्षांनी पुन्हा तिच्याशीच केलं लग्न
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप

टेस्लाच्या एका माजी महिला कर्मचारीचा हवाला देत वॉल स्ट्रिटच्या बातमीत दावा केला गेला की, मस्क हे महिलांचा पिच्छा पुरवित असत आणि आपले म्हणणे त्यांनी ऐकावे यासाठी दबाव टाकत असत. स्पेसएक्सच्या एका माजी महिला फ्लाईट अटेंडंटने सांगितले की, २०१६ साली एलॉन मस्क तिच्यासमोर नग्नावस्थेत उभे राहिले आणि लैंगिक संबंधाची मागणी करू लागले. याबदल्यात तुला घोडा भेट म्हणून देईल, असेही आमिष तिला दाखविले.

२०१३ साली स्पेसएक्स कंपनीतून राजीनामा दिलेल्या एका महिलेने सांगितले की, एलॉन मस्कने सदर महिलेकडून आपल्या मुलांचा जन्म व्हावा, अशी गळ घातली होती. आणखी एका महिला कर्मचारीशी एलॉन मस्क यांचे लैंगिक संबंध होते. मात्र २०१४ साली तिला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. ही महिला थेट एलॉन मस्क यांनाच रिपोर्ट करत होती.

वॉल स्ट्रिटच्या बातमीत पुढे म्हटले की, महिला कर्मचाऱ्यांनी रात्री एलॉन मस्क यांच्याबरोबर शय्या करावी, यासाठी ते कर्मचाऱ्यांना टेक्स्ट मेसेज करत असत. ज्या महिला या मेसेजेसला रिप्लाय करत नसत किंवा मस्क यांचे म्हणणे ऐकत नसत त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जायची.

स्पेसएक्स आणि मस्क यांच्या वकिलांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये छापून आलेली माहिती असत्य आणि निराधार असल्याचा पलटवार त्यांनी केला.