Elon Musk With Children : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर असून अमेरिकेत त्यांनी जगप्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एलॉन मस्क यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या तीन मुलांनाही आणलं होतं. त्यांच्या या कृतीने अवघ्या जगाचं लक्ष वेधलं असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात गुरुवारी वॉशिंग्टन डीसी येथे ब्लेअर हाऊस येथे एलॉन मस्क यांची भेट घेतली. मस्कसोबत त्यांची पार्टनर आणि न्यूरालिंकचे संचालक शिवोन झिलिस देखील होती. त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. या भेटीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता, एलोन मस्कचे चाहते टेस्लाच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. जागतिक नेत्यांना भेटण्याकरता मुलांना सोबत नेल्याबद्दल नेटकऱ्यांनी मस्क यांचं कौतुक केलं. ते जगातील सर्वात श्रेष्ठ वडील असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

“खूपच अद्भुत… लिल एक्स एक अद्भुत माणूस आहे आणि त्याचे वडील महान आहेत. आमच्या महान नायकावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, अध्यक्ष महोदय. तुमचे खूप खूप कौतुक, एलॉन मस्क ,” एका एक्स वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने लिहिले, “एलॉन मस्क हा खरा नायक आणि एक महान पिता आहे. अमेरिकेला एलॉन मिळाल्याने भाग्यवान वाटते.” तिसऱ्याने टिप्पणी केली, “एलॉन मस्क हा एक महान पिता आहे. तो त्याच्या मुलांना, लिल एक्स, अझ्युर आणि स्ट्रायडरला पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीला घेऊन गेला.” काहींनी पोस्ट केले, “एलॉन मस्क हा एक महान पिता आहे.”

एलॉन मस्क यांच्या भेटीबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “वॉशिंग्टन डीसीमध्ये एलॉन मस्क यांच्याशी खूप चांगली भेट झाली. आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अवकाश, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यावर आमची प्रदीर्घ चर्चा झाली. मी सुधारणा आणि ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ पुढे नेण्याच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांबद्दल बोललो”, असं त्यांनी लिहिले.

Story img Loader