Elon Musk On Ashley St. Clair Claims: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्री हाती घेतल्यानंतर, त्यांचा दबदबा आणखी वाढला आहे. अशात ३१ वर्षीय तरुणी अ‍ॅशले सेंट क्लेअरने दोन दिवसांपूर्वी, ती एलॉन मस्क यांच्या बाळाची पाच महिन्यांपूर्वी आई झाली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिची एक्स पोस्ट खूप व्हायरल झाली होती. यानंतर सोशल मीडियावर बऱ्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. अशात एका युजरने अ‍ॅशले सेंट क्लेअरने मस्क यांना फसवण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी कट रचल्याचा आरोप करणारी पोस्ट केली होती. यावर आता मस्क एका शब्दात व्यक्त झाले आहेत.

अरेरे…

एका युजरने एक्सवर एक स्क्रीनशॉट पोस्ट करत लिहिले होते की, “एलॉन मस्क यांना अडकवण्यासाठी अ‍ॅशले सेंट क्लेअरने अर्ध्या दशकांपूर्वी कट रचला होता.” त्यानंतर मस्क यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना “अरेरे” (Whoa) असे म्हटले. यानंतर अ‍ॅशले सेंट क्लेअरने लगेचच मस्क यांच्यावर टीका करत, “ते परिस्थिती थेट हाताळण्याऐवजी अफवांना प्रतिक्रिया देत आहेत”, असे म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अ‍ॅशले सेंट क्लेअर या तरुणीने दोन दिवसांपूर्वी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, “पाच महिन्यांपूर्वी, मी या जगात एका बाळाचे स्वागत केले. एलॉन मस्क त्याचे वडील आहेत. माझ्या मुलाच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी मी, याबाबत काहीही उघड केले नव्हते, परंतु टॅब्लॉइड मीडिया याबाबत वृत्त देणार असल्याचे समजल्यानंतर, काहीही नुकसान झाले तरी याबाबत माहिती देण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या बाळाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढवायचे आहे. या कारणास्तव, मी माध्यमांना विनंती करते की त्यांनी आमच्या बाळाच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि याबाबतचे आक्रमक वृत्तांकन टाळावे.” दरम्यान या दाव्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत.

कोण आहे अ‍ॅशले सेंट क्लेअर?

अ‍ॅशले सेंट क्लेअरने ‘एलिफंट्स आर नॉट बर्ड्स’ हे पुस्तक लिहिले असून, यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. या पुस्तकातून तिने रूढीवादी दृष्टिकोन मांडले आहेत. याचबरोबर ती बॅबिलोन बी या व्यंगचित्र संकेतस्थळासाठी देखील लेखन करते. याचबरोबर उजव्या विचारसरणीकडे कल असलेली अ‍ॅशले सेंट क्लेअरने सतत विविध विषयांवर आक्रमकपणे व्यक्त होत असते.

Story img Loader