Elon Musts Tesla is in centre of attacks in us car : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून टेस्ला कंपनीचे सीईऔ एलॉन मस्क जास्तच चर्चेत आले आहेत. यादरम्यान मस्क यांच्या टेस्ला कंपनीला लक्ष्य केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून उजेडात येत आहेत. लास वेगासमध्ये काळे कपडे घातलेल्या एका व्यक्तीने मंगळवारी पहाटे एका कार दुरूस्ती केंद्रात गोळीबार करून अनेक टेस्ला गाड्या पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर लास वेगास पोलीस आणि एफबीआयकडून देशांतर्गत दहशतवादाच्या शक्यतेचा तपास केला जात आहे.
स्थानिक वेळेनुसार साधारणपणे पहाटे २.४५ वाजता ही घटना घडली. यानंतर लास वेगास मेट्रोपोलीटन पोलीस डिपार्टमेंटला (LVMPD) टेस्लाच्या फॅसिलीटीला आग लागल्याबद्दल अनेक ९११ फोन कॉल्स करण्यात आले. यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा अनेक टेस्ला गाड्या पेटलेल्या आढळून आल्या आणि ‘रेझिस्ट’ (Resist) हा शब्द मुख्य दरवाज्यावर स्प्रे-पेंट वापरून लिहीण्यात आला होता, अशी माहिती असिस्टंट शेरिफ डोरी कोरेन यांनी दिली. “हे टेस्ला फॅसिलीटीला लक्ष्य करत केलेले हल्ला होता,” असेही कोरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
JUST IN: The FBI is on the scene after several Teslas were lit on fire at a Tesla service center in Las Vegas, according to LV Review-Journal.
— Collin Rugg (@CollinRugg) March 18, 2025
The arson incident unfolded at 2:45 am in what appears to be a terror attack.
"Communications received information that an individual… pic.twitter.com/Nng2FXKSZ0
नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही फुटेजनुसार, काळे कपडे परिधान केलेल्या आरोपीने गाड्यांवर आधी गोळीबार केला आणि त्यानंतर दोन गाड्या मोलोटोव कॉकटेल्स वापरून पेटवून दिल्या. पोलिसांना तिसर्या वाहनात न फुटलेले मोलोटोव कॉकटेल आढळून आले आहेत. आग कारच्या बॅटरीपर्यंत पोहचण्याच्या आधीच आटोक्यात आणण्यात आली, तसेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
एफबीआयच्या जॉइंट टेररीझम टास्क फोर्स या प्रकरणाचा तपास करत आहे. एफबीआयच्या लास वेगास फील्ड ऑफिसचे प्रभारी विशेष एजंट स्पेन्सर इव्हान्स यांनी घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले. “हा एक फेडरल गुन्हा आहे,” असे इव्हान्स म्हणाले. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले किंवा इतर कोणी असाच प्रकार करण्याचा विचार करत असेल तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांना यावेळी दिला. हा हल्ला देशभरातील टेस्लाच्या मालमत्तेला लक्ष्य करत गेल्या काही दिवसांत झालेली तोडफोड आणि हिंसाचाराच्या कृत्यांशी संबंधित आहे का याचा तपास एफबीआय करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकदा हल्ले
दरम्यान लास वेगास येथे झालेला हल्ला हा टेस्लाच्या अस्थापनावर अमेरिकेत हल्ला होण्याची पहिलीच वेळ नाही. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच बॉस्टनच्या जवळ एका शॉपिंग मॉलमध्ये सात टेस्ला चार्जिंग स्टेशन पेटवून देण्यात आले होते. त्याच्या आठवडाभरानंतर सहा आंदोलकांना न्यूयॉर्कच्या टेस्ला शोरूममध्ये घुसल्यावरून अटक करण्यात आली होती. ओरेगन येथे गुरूवारी पहाटे टेस्ला डिलरशीपवर गोळीबार करम्यात आला होता, ज्यामध्ये तीन कारचे नुकसान झाले होते.
ट्रम्प प्रशासनात ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’(DOGE) मधील एलॉन मस्क यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर हे हल्ले केले जात आहे.
अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल पामेला बोंडी यांनी टेस्ला मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या लाटेला देशांतर्गत दहशतवाद म्हटले आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात, त्यांनी सांगितेल की, जस्टिस डिपार्टमने अशा हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेकांविरोधात आधीच गुन्हे दाखल केले आहेत, त्यापैकी काहींना किमान पाच वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.